पूरग्रस्त नागरिकांच्या सेवेसाठी चंद्रकांत पाटील कार्यतत्पर… पूरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसह, बाधितांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

44

पुणे : पुण्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे पुण्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यापासून चंद्रकांत पाटील यांचे सर्वत्र लक्ष होते. नागरिकांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी चंद्रकांत पाटील आणि त्यांचे शिलेदार दिवसरात्र काम करत होते. सरकार कडून मदत जाहीर होण्यापूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी लोकसहभागातून नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पूर परिस्थितीचा आढावा घेऊन कोथरूड भागातील नागरिकांना शर्ट व साड्या, जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करण्यात आले.

पुण्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला. या पावसाने पुण्यात पूर परिस्थिती निर्माण केली. खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाण ईपुर परिस्थिती निर्माण झाली. अनेक नागरिकांच्या घरात अचानक पाणी शिरले. कोथरूडमधील राजपूत वीटभट्टी, खिलारे वाडी, डीपी रोड येथील शाहू वस्ती या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. घरात पाणी शिरल्याने अनेक वस्तूंचे नुकसान झाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना मदतीचा हात पुढे केला. नागरिकांची सर्वप्रकारची व्यवस्था त्यांच्यामार्फत करण्यात आली.

कोथरूड मधील पुरबाधित लोकांना एरंडवणे भागातील अनुसयाबाई खिल्लारे शाळेत स्थलांतरित करण्यात आले. तेथे त्यांची खाण्यापिण्याची सोया करण्यात आली. तर शाहू वस्तीतील बाधित लोकांना ज्ञानदा प्रशालेत स्थलांतरित करून त्यांची तेथे राहण्याची सोय करण्यात आली. यावेळी पाटील यांनी संपूर्ण पूरग्रस्त भागाची पाहणी करून लोकसहभागातून नागरिकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला. पाटील यांनी जेटिंग आणि मजुरांच्या मदतीने नागरिकांची घरे स्वच्छ करून दिली. एक महिना पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांची मोठ्या प्रमाणात मदत केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.