कोथरुड मधील नामदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

13

पुणे : “निसर्ग छाया” उपक्रमांतर्गत कोथरूड मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील सपत्नीक दांडिया महोत्सवास उपस्थित होते. दांडिया मध्ये रमून सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.

चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला अभिनव उपक्रम म्हणजे निसर्गछाया. ज्येष्ठ नागरिकांच्या शांत आणि निवांत विसाव्यासाठी याची सुरुवात करण्यात आली. या निसर्गरम्य ठिकाणी कोथरुड मधील असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत येथे दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दांडिया मध्ये ज्येष्ठ नागरिकांनी रमून सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. या वयातही त्यांचा हा उत्साह पाहून एक वेगळाच आनंद मिळाला असल्याचे पाटील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.