चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारामुळे मुस्लिमांची अतिक्रमणे हटली !

20

पुणे : महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या धाडसी निर्णयामुळे सुतारवाडी परिसरात मुस्लिमांनी केलेली अतिक्रमणे हटली, आणि हिंदूबहुल असलेल्या या भागातील हिंदूंनी सुटतेचा नि:श्वास टाकला. सुतारवाडीत कोणताही तणाव न होता, हा प्रश्न सुटल्यामुळे पुन्हा एकदा या परिसरातील हिंदू- मुस्लिम समाधानाने एकत्र राहू लागले आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादा यांच्या या कामाचं सध्या मोठ्या प्रमाणात कौतूक होऊ लागले आहे.

मुस्लिम समाजाला सुतारवाडीत कब्रस्तान (दफनभूमी) म्हणून दिलेल्या जागेचा उपयोग इतर धार्मिक कार्यांसाठी करणे, कब्रस्तानच्या जागेवर मशीद उभी करणे, नमाजपठण करणे, धार्मिक शिक्षण देणे, यासारख्या उपक्रमातून या भागात मुस्लिमांकडून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा उद्योग सुरू होता. एकूणच या सर्व प्रकारांच्या विरोधात स्थानिक हिंदु बांधवांनी एकत्र येऊन संघर्ष उभा केला. मात्र, मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी हिंदूबहुल भागात हिंदूंना प्रशासनाशी तब्बल १५ वर्षांपेक्षा जास्त काळ लढा द्यावा लागला.

अखेर चंद्रकांतदादांनी यामध्ये स्वतः लक्ष घालून हे अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. त्यानुसार महापालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करुन हे काम हटवले. त्यामुळे सुतारवाडीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पुण्यामध्ये कोठेही संघर्ष निर्माण होऊ नये, यासाठी चंद्रकांतदादा नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर कोथरूड परिसरातील मतदार पूर्णपणे समाधानी आहे आणि त्यांनाच पुन्हा विधानसभेवर पाठवण्याचा चंग मतदारांनी बांधला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.