डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, बंधुता आणि न्यायाचा विचार हाच आपल्या प्रगतीचा खरा पाया आहे – मंत्री चंद्रकांत पाटील

12

पुणे : कोथरूड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘कोथरूड भीम महोत्सव समिती’च्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून सर्व उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, बंधुता आणि न्यायाचा विचार हाच आपल्या प्रगतीचा खरा पाया आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा महोत्सवांचे आयोजन होणे कौतुकास्पद असल्याचे पाटील म्हणाले.

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम, बापू डाकले, मंदार जोशी, नगरसेवक पुनीत जोशी, पृथ्वीराज सुतार यांच्यासह डॉक्टरांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.