कोथरूडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ७०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

15

पुणे : कोथरूड येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित २४ व्या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात दहावी-बारावीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांत नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनाने मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढावे यासाठी मोफत शिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे नमूद केले. यासोबतच पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.

संस्कृती प्रतिष्ठानची वाटचाल केवळ गुणवंतांचा सत्कार करण्यापुरती मर्यादित नाही. समाजासाठी सक्षम, संवेदनशील आणि राष्ट्रभिमानी तरुण पिढी घडविणे हा आमचा ध्यास आहे. याच भावनेतून स्पर्धा परीक्षांसाठी १०० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. संस्कृती प्रतिष्ठान आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आणि आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून अधिकाधिक गुणवंत तरुणांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश करून राष्ट्रसेवेत योगदान द्यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या कार्यक्रमास झारखंडचे नागरी संरक्षण आयुक्त रमेश घोलप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.