मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या ‘दीक्षित डाएट’ केंद्राला भेट; ‘निरोगी महाराष्ट्र’ संकल्पनेचे केले कौतुक

10

पुणे : लोकांमध्ये वाढता मधुमेह आणि लठ्ठपणा या समस्यांवर प्रभावी उपाय शोधणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या कोथरूड येथील ‘दीक्षित डाएट’ (डायबेटिज रिव्हर्सल आणि वेट लॉस) केंद्राला महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्राच्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांची आणि डाएट प्लॅन्सची सविस्तर माहिती घेतली.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. दीक्षित यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या या उपक्रमातून निरोगी जीवनशैली, योग्य आहार पद्धती आणि आरोग्याविषयी मोलाची जनजागृती केली जात आहे. निरोगी जीवनशैली, योग्य आहार पद्धती आणि आरोग्याविषयी जनजागृती यामधून समाजाला आरोग्यदायी दिशा देण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. नागरिकांनी आरोग्याबाबत सजग राहून संतुलित जीवनशैली स्वीकारणे, ही काळाची गरज आहे. निरोगी महाराष्ट्राच्या दिशेने हा एक सकारात्मक पुढाकार आहे.

या भेटीदरम्यान डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी त्यांच्या केंद्रात येणाऱ्या नागरिकांना कशा प्रकारे मार्गदर्शन केले जाते आणि वजन नियंत्रण व मधुमेहापासून कशी मुक्ती मिळते, याची सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली. या प्रसंगी परिसरातील अनेक नागरिक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.