‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत भाजपच्या दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्गाचा पुण्यात शुभारंभ; मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

10

पुणे : पुणे येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ उपक्रमाअंतर्गत भाजपा पुणे शहराच्या दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण वर्गाची उत्साहात सुरुवात झाली. ​या प्रशिक्षण वर्गाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती दर्शवत, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.

या कार्यशाळेचा मुख्य भर संघटना बळकट करणे, भाजपची विचारसरणी, प्रभावी जनसंवाद, बूथ सक्षमीकरण, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाजसेवा या विषयांवर होता. या कार्यशाळेतील सत्रे सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरली. अशा पद्धतीच्या विशेष प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनेला निश्चितच बळ मिळेल असा विश्वास यावेळी दर्शवण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभर राबविण्यात येणाऱ्या जनकल्याणकारी योजनांची दिशा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांबाबत या प्रशिक्षण वर्गामध्ये सखोल मार्गदर्शन करण्यात आले. संघटन अधिक सक्षम करणे, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे तसेच भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि लोकहिताचे कार्य प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग प्रेरणादायी ठरत आहे.

याप्रसंगी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, रवींद्र साठे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने, आमदार योगेश टिळेकर, आमदार सुनील कांबळे, आमदार भिमराव तापकीर, माजी आमदार जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.