कोल्हापुरात ‘श्री सिद्धिविनायक गणपती स्टॉल’चे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन; बाप्पाची मनमोहक रूपे पाहून मन भारावले!

8

कोल्हापूर : सर्वत्र गणेशोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह ओसंडून वाहत असताना आणि लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, कोल्हापूर येथील ‘श्री सिद्धिविनायक गणपती स्टॉल’चे भव्य उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्टॉलवर अत्यंत कलाकुसरीने साकारलेली श्रीगणेशाची विविध, देखणी आणि मनमोहक रूपे पाहून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूर्तिकार व कलाकारांचे कौतुक केले. बाप्पाच्या या मूर्तींचे दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न आणि भारावून गेल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रसंगी उपस्थित राहून नवीन स्टॉलसाठी आयोजकांना व व्यवसायिकांना आगामी काळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला स्थानिक नागरिक आणि गणेशभक्तांची मोठी उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.