चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कसबा पोटनिवडणुकीतील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पुणे : आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवड आणि कसबा जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. हि पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने प्रयन्त केला आहे. परंतु महाविकास आघाडीने हि निवडणूक लढण्याची तयारी मात्र सुरु केली आहे. महाविकास आघडीने दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने आज प्रचाराचा नारळ देखील वाढवला . पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कसबा येथील उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कसबा पोटनिवडणुकीतील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारास नारळ वाढवून सुरुवात झाली. या वेळी मंत्रिमंडळातील सहकारी सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि पदाधिकारी सोबत होते. तत्पूर्वी श्री ओंकारेश्वरांचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणची विधनसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कसबा येथून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आली आहे. तर चिंचवड येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे आव्हान आहे.