पक्षनिष्ठा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच आम्हा सर्वांना अजून ऊर्जा मिळते – चंद्रकांत पाटील

पुणे  : कसबा आणि चिंचवड निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील हे अतिशय जोमाने कामाला लागले आहे. कसबा येथील उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड येथील उमेदवार श्रीमती आश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने रविवार पेठ परिसरातील प्रचारात सहभाग घेतला.

चंद्रकांत पाटील यांनी कसबा निवडणुकीसाठी रविवारी जनसंघापासून ते भाजपापर्यंतच्या जडणघडणीत पक्षाच्या कामात सदैव सक्रीय राहिलेल्या मिराताई पावगी आणि वसंत प्रसादे यांची भेट झाली. मिराताईंचं वय वर्ष ९३ आणि वसंतराव प्रसादे यांचं वय ८८ असूनही पक्षासाठी आजही दोघेही तळमळीने कार्यरत आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयासाठी मिराताई आणि वसंतरावांनी भरभरुन आशीर्वाद दिले. अशा पक्षनिष्ठा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच आम्हा सर्वांना अजून ऊर्जा मिळते. ताई आणि वसंतराव यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहोत, अशी भावना व्यक्त करुन, तब्येतीची विचारपूस करुन काळजी घेण्याची अर्जवी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली.

कसबा आणि चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणूकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कसबा पेठ मतदारसंघात २ लाख ७५ हजार ४२८ मतदार तर चिंचवड येथे ५ लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत. भाजप निवडणुकीच्या प्रचारात पुढे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भाजपकडून पदयात्रा, रॅली काढण्यात येत असून जेष्ठ नागरिक ते युवावर्ग यांना भाजप आकर्षित करत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!