पुणे जिल्ह्यातील मौजे वेल्हे बु. येथील श्री मेंगाई देवी भक्त निवासाच्या बांधकामाचेलकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे ग्रामीण दौऱ्यावर असतांना विविध विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत नुकताच पुणे जिल्ह्यातील मौजे वेल्हे बु. येथील श्री मेंगाई देवी भक्त निवास बांधकामासाठी १० लाखांचा निधी उपलब्ध झाला करण्यात आला, आज या भक्तनिवासाच्या बांधकामाचे भूमिपूजन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

यावेळी गट विकास अधिकारी पंकज शेळके, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप-अभियंता विकास कुलकर्णी, श्री मेंगाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष प्रकाश पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राजेंद्र शिळीमकर, किरण दगडे पाटील, राणीताई भोसले आदी उपस्थित होते.