कोथरुडमधील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कटिबद्ध राहणे मी माझे कर्तव्य समजतो – चंद्रकांत पाटील

2

पुणे: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. कोथरूडमधील  प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कटिबद्ध राहणे हे चंद्रकांत पाटील आपले कर्तव्य समजतात.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना उत्तम सेवा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी देखील ते नेहमीच प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नातून पाटील यांनी काही दिव्यांग बांधवाना मदत केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना उत्तम सेवा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी मी प्रयत्नशील असतो. तसेच, दिव्यांग बांधवांनाच्या मदतीसाठी देखील अविरतपणे कार्य सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज कोथरुडमधील ऋषिकेश गोसावी, परशुराम चलवादी आणि विलास शिंदे यांना दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या माध्यमातून मदत करण्याची संधी मिळाली. या तिघांनाही उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा, असे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.