१५ हजार हून अधिक गोरगरीब कुटुंबीयांची दिवाळी आणखी गोड व्हावी यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी साहित्य वाटप

46

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जनकल्याण कार्याचा आदर्श घेऊन दरवर्षी अमोल बालवडकर फाऊंडेशन व भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने बाणेर, बालेवाडी सुस म्हाळुंगे, पाषाण ,सुतारवाडी, सोमेश्वरवाडी भागातील गोरगरीब होतकरू कुटुंबासाठी कर्तव्य म्हणून दीपावली सरंजाम वाटप करण्यात येते. याही वर्षी परिसरातील १५ हजार गोरगरीब कुटुंबांसाठी उच्च  दिपावली सरंजाम वाटपाचा कार्यक्रम राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी  यावेळी म्हटले कि,  माझ्या कोथरुड मतदारसंघातील बाणेर मधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिवाळी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. याबाबत मला अतिशय आनंद होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दिवाळी साहित्य वाटप करुन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर आण्णा मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे,पुणे मनपा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच भारतीय जनता पार्टी कोथरुड (उ) विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.