आजच्या सामन्यात देखील भारत विजयी होईल चंद्रकांत पाटीलांचा दृढ विश्वास

आज होणाऱ्या भारत विरुद्ध न्युझीलंड संघांच्या क्रिकेट वर्ल्ड कप च्या उपांत्य फेरीच्या सामान्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाटील म्हणाले भारतीय क्रिकेट संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येणार असून हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या क्रीडाकौशल्याचे अद्भुत प्रदर्शन दाखवत भारत आजतागायत एकदाही पराभूत झालेला नाही, त्यामुळे आजच्या सामन्यात देखील भारत विजयी होईल असा दृढ विश्वास देखील पाटील यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.