भाजपच्या उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील पदनियुक्ती पत्र वितरण सोहळा चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

10

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील पदनियुक्ती पत्र वितरण सोहळा आज पार पडला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, प्रदेश कार्यालय प्रमुख रवीजी अनासपुरे, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्योगातून युवकांचे भविष्य घडवणे आणि त्यातून देशाची प्रगती साध्य करणे हा उद्देश घेऊन भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा प्रसार करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. यावेळी प्रमोद वाकोडकर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.