कोथरूड मतदारसंघातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील माझ्या लेकींचे वैवाहिक जीवन सुखी, समृद्ध आणि आनंददायी राहो, अशी माझी नेहमीच अपेक्षा – चंद्रकांत पाटील
पुणे : बापाचं राजासारखं मन अधोरेखित करणारं उत्तम उदाहरण म्हणजे कन्यादान ! कन्यादानासारखे दुसरे पुण्य नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कन्यादानाचे पुण्य मिळवले आहे. चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. कन्यादानाच्या वस्तू भेट देऊन चंद्रकांत पाटील यांनी हे पुण्याचे काम केले आहे.
मतदारसंघातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील माझ्या लेकींचे वैवाहिक जीवन सुखी, समृद्ध आणि आनंददायी राहो, अशी चंद्रकांत पाटील यांची नेहमीच अपेक्षा असते. त्यांच्या कोथरूडमधील भाग्यश्री मुळीक आणि अक्षता मुरमुरे या दोन लेकींचा लवकरच विवाह होणार आहे, या अनुषंगाने त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आवश्यक वस्तू चंद्रकांत पाटील यांनी भेट म्हणून दिल्या. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून या वस्तू देण्यात आल्या. चंद्रकांत पाटील यांनी या दोघींनाही त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी मनापासून शुभेच्छा…!