भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या ‘दृष्टिकोन’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

9

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या ‘दृष्टिकोन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन जिमखाना येथे संपन्न झाला.  राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . ते म्हणाले कि, माध्यमांमध्ये भाजपाची वैचारिक बाजू मांडण्यात माधवजींनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्या काळात मर्यादित माध्यमे उपलब्ध होती; त्याकाळात देखील माधवजींनी भारतीय जनता पक्षाची बाजू माध्यमांमध्ये प्रकर्षाने मांडली. त्यामुळे त्यांचे हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मिलिंद एकबोटे तसेच जनजागर प्रतिष्ठानचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उत्कर्ष प्रकाशन संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ‘ दृष्टिकोन ‘ चा प्रकाशन सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शेकडो प्रती वाचकांनी विकत घेतल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.