प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांशी साधला संवाद… चंद्रकांत पाटील यांचा कर्वेनगर येथून कार्यक्रमात सहभाग

16

पुणे : आज  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला.  या कार्यक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर येथे आयोजन करण्यात आले होते.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यावेळी केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविता यावा यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे, नागरिकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले . यात्रेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना लाभ होत असल्याबद्दल पाटील यांनी समाधान देखील व्यक्त केले.
या कार्यक्रमास खा. प्रकाशजी जावडेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे देखील उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.