पुण्यात चौथ्या विश्वविक्रमाची नोंद…. या विश्वविक्रमासाठी पुणेकरांचे मनःपूर्वक अभिनंदन – चंद्रकांत पाटील

4

पुणे : वाचन संस्कृती वाढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने भारताने संलग्न चौथ्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे.. या विश्वविक्रमांतर्गत ११ हजार ४३ नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद ३० सेकंदात वाचण्याचा नवा विश्वविक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवला आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात या पूर्वी नोंदवलेल्या तीन विश्वविक्रमानंतर चौथ्या विक्रमाची नोंद उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, असा रेकॉर्ड चीनच्या नावावर होता. या महोत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा चीनचा रेकॉर्ड मोडण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने विश्वविक्रमात पुन्हा एकदा भारताने चीनला मागे टाकले आहे. या विश्वविक्रमासाठी पुणेकरांचे पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
‘लार्जेस्ट ऑनलाइन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनिमम ड्यूरेशन ऑफ ३० सेकंड’ या संकल्पनेवर विश्वविक्रम नोंद झाल्याचे गिनेस बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी जाहीर केले.
या वेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे, मसापचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.