आगामी काळातील निवडणुकांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते नियोजन करतील – चंद्रकांत पाटील

पुणे : कर्वेनगर येथील डीपी रस्त्यावरील भारतीय जनता पार्टीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित केलेल्या स्नेन्ह मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.
पुणे महापालिका परिसरातील मध्यवर्ती कार्यालय पक्षाच्या वतीने डीपी रस्त्यावरील नवीन वास्तूत स्थलांतरित करण्यात आले. आगामी काळातील निवडणुकांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्ते नियोजन करतील, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांशी अनौपचारिक संवाद साधला.
यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदष सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,महिला आघाडीच्या प्रमुख हर्षदा फरांदे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!