उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड  मतदारसंघातील शिवपार्वती सोसायटी मधील रहिवाशांच्या घरी भेट देऊन अयोध्येतील श्रीरामांच्या आगमनाचे दिले निमंत्रण

4
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड  मतदारसंघातील शिवपार्वती सोसायटी मधील रहिवाशांच्या घरी भेट देऊन अयोध्येतील श्रीरामांच्या आगमनाचे निमंत्रण दिले.  प्रत्येक घरोघरी अक्षता देऊन सर्वांना प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाटील यांनी दिले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर अयोध्या येथे साकार होत आहे. या मंदिरात येत्या २२ जानेवारी २०२४ ला प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची सर्वच राम भक्तांना आतुरता लागली आहे. प्रत्येक घरोघरी अक्षता देऊन सर्वांना प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले जात आहे. आज मी देखील या अभियानात सहभागी होऊन माझ्या कोथरुड मतदारसंघातील शिवपार्वती सोसायटी मधील रहिवाशांच्या घरी भेट देऊन अयोध्येतील श्रीरामांच्या आगमनाचे निमंत्रण दिले.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात २२ जानेवारी रोजी दुपारी १२. ३० वाजता श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. ११. ३० ते १२. ३० पर्यंत गर्भगृहात पूजा होणार असून त्यानंतर मंदिरात दर्शनाला सुरुवात होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.