ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

7
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मधील पुरोहितांशी आज संवाद साधला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना सक्षम करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याचा कोट्यवधी भारतीयांना लाभ होत असल्याचे पाटील म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले कि, माननीय मोदीजींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन कोथरुड मध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचा पुरोहित वर्गाने ही लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. याप्रसंगी ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, दक्षिण कोथरुड मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, ॲड मिताली सावळेकर, परशुराम संघाचे विश्वजीत देशपांडे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कुलदीप सातवळेकर, यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.