उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरूडमधील रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचे मानले आभार

26

पुणे : हिंदूहृदयसम्राट वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व जनाबाई मोकाटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त समस्त गावकरी मंडळ कोथरुड परिवाराच्या वतीने महारक्तदान शिबीर आणि महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.

चंद्रकांत पाटील यांनी आज रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच, शिबिर सुनियोजित पद्धतीने पार पडावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.