उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमो चषक २०२४ अंतर्गत खेळण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेतील खेळाडुंसमवेत क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद

8

पुणे : नमो चषक २०२४ अंतर्गत भाजपा युवा मोर्चा कोथरुड मंडल दक्षिणच्या वतीने टर्फ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या स्पर्धेतील स्पर्धकांना भेट देऊन सर्वांना खेळासाठी प्रोत्साहन दिले.

पाटील यांनी यावेळी खेळाडुंसमवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. ते म्हणाले कि, नमो चषक २०२४ अंतर्गत विवीध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यातीलच एक लोकप्रिय स्पर्धा म्हणजे क्रिकेट!आपल्याकडे क्रिकेटची मोठी क्रेझ आहे. अनेक तरुण याकडे करिअर म्हणून पाहतात. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद स्पर्धकांनी मनमुरादपणे लुटावा अशा शुभेच्छा पाटील यांनी याप्रसंगी दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.