चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोथरुड मतदारसंघातील सानेवाडी औंध व विधाते वस्ती बाणेर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न

पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील सानेवाडी औंध व विधाते वस्ती बाणेर येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी कॉंग्रेसचे मनोज दळवी यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील याची माहिती दिली कि, जगात सर्वाधिक सदस्यता असलेला भारतीय जनता पक्ष आहे. एवढी मोठी ताकद असूनही, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे अनेक नवनवीन नेतृत्व पक्षाशी जोडली जात आहेत. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि तेच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे, असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर दत्ता गायकवाड, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, रवी साळेगावकर, सुनील पांडे, कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, राहुल कोकाटे, वैभव विधाते, सनी निम्हण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!