“आर्टिकल 370” या चित्रपटाचे कोथरूडमध्ये मोफत स्क्रीनिंग… कोथरूडकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

5
पुणे , ०१ मार्च : कलम ३७० रद्द करणे हा भारतीय इतिहासातला सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय होता .हे कलम रद्द केल्यामुळे काश्मीरमध्ये विकास गंगा पोहचली असून शांतताही प्रस्थापित झाली आहे. हे कलम रद्द केले जात असताना केलेला संघर्ष, कायदेशीर प्रक्रिया इत्यादी “आर्टिकल 370” या चित्रपटाच्या माध्यमातून एका रोमांचक पद्धतीने पडद्यावर मांडली आहे. हे सर्व कोथरूडकारांना अनुभवता यावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी “आर्टिकल 370” या चित्रपटाचे मोफत स्क्रीनिंग कोथरूडमध्ये आयोजित केले आहे. कोथरूडकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, शनिवारी २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता तसेच रविवारी दुपारी १२ व ३ वाजता सिटीप्राईड कोथरूड येथे “आर्टिकल 370” या चित्रपटाचे स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. या शो ची तिकिटे चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड कार्यालयात शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आणि शनिवारी २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता उपलब्ध होतील.
आर्टिकल 370 हे राज्यघटनेत 17 ऑक्टोबर 1949 रोजी समाविष्ट करण्यात आलं. या कलमानुसार भारताची राज्यघटना काही कलमांचा अपवाद वगळता काश्मीरला लागू होत नाही, त्यामुळे काश्मीरला स्वत:ची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात भारतीय संविधानातील आर्टिकल 370 संबंधित कथा दाखवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये काय स्थिती होती आणि आर्टिकल 370 हटवण्यासाठी काय-काय करावं लागलं हे सर्व या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.