पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघात नेहमीच नवनवे उपक्रम राबवत असतात. त्यांनी कोथरुड मतदारसंघातील श्रमिक बांधवांची सेवा करता यावी या करिता प्रेमाची न्याहारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा असंख्य श्रमिक लाभ घेत आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, माझ्या गुरुंनी सेवा हाच खरा धर्म असल्याची शिकवण मला दिली आहे. यामुळेच माझ्या असंख्य श्रमिक बांधव या उपक्रमाचा लाभ घेत आहेत ही बाब सुखावणारी आहे. पाटील यांनी स्वतः आज या ठिकाणी भेट देऊन श्रमिक बांधवांना न्याहारी वाटप केली, तसेच त्यांच्या सोबत न्याहारीचा आस्वादही घेतला.
यावेळी सर्वांशी संवाद साधताना पाटील यांनी म्हटले कि, श्रमिक बांधवांच्या उत्तम आरोग्यासाठी तपासणी केंद्र सुरु करणे, श्रमिक बांधवांसाठी पुण्याच्या आसपासच्या तीर्थक्षेत्राची भेट घडवणे आणि त्यांना शासकीय कागदपत्र मिळावे यासाठी सेवा केंद्र सुरु करण्याचा मानस व्यक्त केला. याचा सर्व बांधवांनी लाभ घ्यावा असेही आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले.