आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड मतदारसंघातील विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

6

पुणे :आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याची विविध ठिकाणी भेटी दिल्या. समाजातील प्रत्येकाचे आरोग्य अबाधित राहण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. महिला दिनानिमित्त आज कोथरूडमधील सुतार दवाखान्यात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा पाटील यांनी सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आरोग्यसेवेत त्या जे अमूल्य योगदान देत आहेत, त्यांच्याबद्दल पाटील यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांनी यासोबतच जागतिक महिला दिनानिमित्त कोथरुड बसडेपोमधील महिला कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान केला. उपस्थित सर्व भगिनींना महिला दिनाच्या त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.
पाटील यांनी आज आपल्या निवासस्थानी सुरक्षेसाठी नेमणूक झालेल्या महिला सुरक्षा रक्षकांना देखील भेटवस्तू देऊन महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.