पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून नुकतीच दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून एकूण २० उमेदवारांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला सुगती प्राप्त करून दिली आहे. त्यांचे कर्तुत्व केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर जगातील अनेकांसाठी आदर्श आहे. याच आदर्शाचे पालन करून पुण्याचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, पुण्याच्या विकासात बहुमोल योगदान देतील, असा दृढ विश्वास वाटत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मागील १० वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा उमेदवारांनी केलेल्या विकासकामांना अनुसरून लोकसभा निवडणूकीत भाजपाला घवघवीत यश, जनतेचा आशीर्वाद लाभेल, असेही पाटील यांनी म्हटले.