महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे – चंद्रकांत पाटील

14

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५ आणि २९ मधील भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे. तसेच, सर्वांनी घरोघरी जाऊन संपर्क वाढविला पाहिजे, अशा सूचना दिल्या.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा नेते हेमंत रासने, दीपक पोटे, राजेश येनपुरे, राजेंद्र काकडे यांच्या सह प्रभागातील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.