कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे –  चंद्रकांत पाटील

24

पुणे : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. प्रचाराचे घमासान सुरू झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील उत्तर कोथरूड भागातील प्रभाग क्रमांक ९ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, नेत्याची इच्छा ही आज्ञाच. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा संकल्प पूर्ण करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी संपर्क वाढवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

या वेळी सरचिटणीस पुनीत जोशी, राजेश येनपुरे, दीपक पोटे, कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, कुलदीप सावळेकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रकाश तात्या बालवडकर, लहू बालवडकर, सुभाष भोळ, राहुल कोकाटे तसेच अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.