चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यातील डॉक्टरांचा मेळावा संपन्न

5

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यातील डॉक्टरांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, कोविड काळात आपल्या डॉक्टर आणि संशोधकांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढविण्यात डॉक्टरांचे मोठे योगदान राहिले आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देश आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करत आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात आपल्या विद्यार्थ्यांना युक्रेन मधून सुखरुप बाहेर काढण्याचे काम मोदीजींनी केले.
पाटील पुढे म्हणाले कि, मोदीजींच्या या कार्यामुळेच जनतेचा मोदीजींवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे मोदीजींचे हात अधिक बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. दरम्यान याप्रसंगी उपस्थित सर्व डॉक्टरांनी मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहीर केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.