चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे पश्चीम विभागाच्या सो.क्ष‌.कासार समाजाचा सस्नेह मेळावा संपन्न

24
पुणे : आज पुणे पश्चीम विभागाच्या सो.क्ष‌.कासार समाजाच्या सस्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, समाजात ऐकोप्याची भावना वृध्दींगत होण्यासाठी असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. समाजातील मुली उच्च विद्याविभूषित होत असून, त्या वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेत असल्याची बाब अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.
यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी समाज बांधवांशी संवाद देखील साधला.

Get real time updates directly on you device, subscribe now.