पुण्यात होत असलेल्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशन स्थळाची केली पाहणी.. अधिवेशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी दिल्या सूचना

30

पुणे : राविवारी 21 जुलै रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अधिवेशन पुण्यात होणार आहे. यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन सक्षमीकरण, राज्यात पुन्हा कमळ फुलवण्यासाठीचे नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशन स्थळाची आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करून आढावा घेतला.

रविवारी, म्हणजे २१ जुलैला पुण्यात होत असलेल्या भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरु आहे. रविवार, दि. २१ जुलै २०२४ सकाळी १० वाजता बालेवाडी स्टेडियम, महाळुंगे, पुणे येथे हे अधिवेशन संपन्न होणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. या नियोजनाची माहिती घेऊन अधिवेशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सूचना दिल्या. या अधिवेशनास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाजप कार्यकर्ते एकजूट दाखवतील, असा विश्वास वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.