भाजपा पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने कोथरूडमध्ये आयोजित गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

31

पुणे : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भाजपा पुणे शहर महिला मोर्चाच्या वतीने आज कोथरूडमध्ये गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदर्शनात मांडलेल्या हातमागावरील विविध वस्तूंप्रती ग्राहकांमधील उत्सूकता पाहून आनंद वाटला, असे पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, रेशीम उद्योग हा आपल्या देशामध्ये गेली ५००० वर्षांपासून सुरु आहे. आपला व्यापार जगामध्ये सर्वात मोठा होता. कालांतराने मशिन्स आल्या त्यामुळे हातावर काम करणारा हा उद्योग मागे पडत गेला. त्यामुळे सरकारने असे ठरवले कि, हातमागावर काम करणारे, रेशीम उद्योगावर काम करणारे या सगळ्यांना रजिस्ट्रेशन आपण करायला लावत आहे आणि ६० वर्षांपुढच्या मजुरांना आपण पेन्शन सुरु करत आहोत. अशा प्रकारची प्रदर्शन देखील त्यांना प्रोत्साहित करतात. मी सगळ्या टीमचं अभिनंदन करतो असे पाटील यांनी म्हटले.

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमागावर निर्मित कपडे, चादर, मॅटस् तसेच विविध हस्तकलेशी संबंधीत वस्तु जसे राख्या, ज्वेलरी आदींचे प्रदर्शन व विक्री यामध्ये करण्यात येत आहे.

यावेळी भाजपा शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपा महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि नगरसेविका उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.