बापट परिवाराच्या वतीने ‘एक कट्टा बापटांचा… आठवणी आणि गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे : आज पुण्याचे माजी खासदार आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय गिरीशभाऊ बापट यांची जयंती. स्वर्गीय बापट साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बापट परिवाराच्या वतीने ‘एक कट्टा बापटांचा… आठवणी आणि गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन बापट साहेबांच्या स्मृतिंना अभिवादन केले.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले , बापट साहेब आणि माझं कौटुंबिक नातं होतं. त्यामुळे त्या जुन्या आठवणींना स्मरताना त्यांच्यासोबतच्या अनेक जुन्या आठवणी, किस्से यांना उजाळा मिळाला. त्यांच्या कुटुंबियांशी देखील त्यांनी संवाद साधला. पुण्याच्या राजकीय वाटचालीत बापट साहेबांचे योगदान अतुलनीय आहे. पुण्याच्या जडणघडणीमध्ये आपल्या नेतृत्त्वाने दिशादर्शन करणारे, सर्वपक्षीय नेत्यांशी आपलुकीचे नाते असलेले आणि कसब्याच्या विकासासाठी कायम पुढाकार घेणारे असे बापट साहेब. बापट साहेबांच्या जाण्याने त्यांच्या नेतृत्वाची पोकळी भरून न निघण्यासारखी आहे. त्यामुळे याला थोडी दुःखाची किनार असली तरी हे दुःखमय वातावरण हलकं व्हावं म्हणून बापट यांच्या मित्रपरिवाराने ‘एक कट्टा बापटांचा. या विषयावर हा सस्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.