डॉ. जयश्री फडणवीस लिखित मानससूत्र पुस्तक हे वाचकांना अतिशय उपयुक्त ठरेल असा ठाम विश्वास – चंद्रकांत पाटील

20

पुणे : डॉ. जयश्री फडणवीस लिखित मानससूत्र पुस्तकाचे प्रकाशन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जयश्री फडणवीस लिखित मानससूत्र पुस्तक हे वाचकांना अतिशय उपयुक्त ठरेल असा ठाम विश्वास वाटतो, असे पाटील यांनी यावेळी म्हटले.

डॉ. जयश्री फडणवीस यांनी ‘सकाळ टुडे’ या पुरवणीत लिहिलेल्या लेखांचे संकलन म्हणजे ‘मानससूत्र’ हे पुस्तक होय. लेखनाची भाषा साधी, सोपी आणि मनाला भावणारी आहे. मानवी जीवनाशी निगडित असलेले विविध विषयांवरील विचारप्रेरक लेख मुद्देसूद व समर्पक उदाहरणांसहित या पुस्तकात आलेले आहेत. आनंदी, समृद्ध आणि यशस्वी सहजीवन कसे जगता येईल, याचा अनुभवी वाटाड्या म्हणजे ‘मानससूत्र’ हे पुस्तक होय.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन विभागाचे माजी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सी. एम. चितळे, पुण्यभूषण फाऊंडेशनचे डॉ. सतीश देसाई, माध्यमतज्ज्ञ डॉ.‌ केशव साठे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.