येत्या काळात कोथरूड मधील दहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प – चंद्रकांत पाटील
पुणे : रोटरी क्लबच्या वतीने आयोजित ‘लिट्रसी लिग’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
चंद्रकांत पाटील म्हणले कि, आजच्या घडीला साक्षरता वाढली तरी, मातृभाषेतील साक्षरतेची गरज आहे. राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरींगचा सर्व अभ्यासक्रम मराठीत केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. त्यासोबतच कौशल्य आधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. येत्या काळात कोथरूड मधील दहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प असून, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात शंभर महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही यावेळी स्पष्ट केले. तसेच, उद्योजकांनी या कार्यात मदत करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी अरविंद नातू, जाधवर शितल शाह, संतोष परदेशी, अमृता देवगावकर उपस्थित होते.