गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवालाही जाहिरात शुल्क आकारु नये, चंद्रकांत पाटील यांचे महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश
पुणे : पुणे शहरात गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवात काळात अनेक सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवाप्रमाणे सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतात. तसेच, या नवरात्रोत्सवात अबालवृद्ध, स्त्री, पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या उत्सव काळात महापालिकेकडून नवरात्रोत्सव मंडळांकडून जाहिरात शुल्क आकारले जाते. त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवालाही जाहिरात शुल्क आकारु नये, अशी मागणी पुणे शहर नवरात्रौत्सव समितीने निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार, सदर शुल्क आकारले जाऊ नये, असे निर्देश आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिले.
या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, या नवरात्रोत्सवात अबालवृद्ध, स्त्री, पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या उत्सव काळात महापालिकेकडून नवरात्रोत्सव मंडळांकडून जाहिरात शुल्क आकारले जाते. सदर शुल्क गणेशोत्सवाप्रमाणे न आकारात ते निशुल्क करणेबाबत प्रस्तुत निवेदनाद्वारे विनंती केली आहे. तरी पुणे शहर जिल्हा नवरात्र उत्सव महामंडळ समिती यांच्या निवेदनानुसार आगामी नवरात्रोस्तव मंडळांच्या जाहिरातीवर शुल्क आकारणी न करणेबाबत निर्णय घेऊन सहकार्य करावे असे यात नमूद करण्यात आले आहे.