चंद्रकांत पाटील यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बाणेर-बालेवाडीकरांना भेटण्यासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून यावेळी पुन्हा चंद्रकांतदादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी बाणेर-बालेवाडीकरांना भेटण्यासाठी भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. या भव्य रॅलीमध्ये सहभागी होण्याची नम्र विनंती पाटील यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बाणेर-बालेवाडीकरांना भेटण्यासाठी भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. कोथरूडमध्ये विकासाची गंगा अव्यावहत वाहती राहण्यासाठी मोठ्या संख्येने तुम्ही यापुढेही प्रतिसाद द्यालच!, असे पाटील यांनी म्हटले. तसेच मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हा अशी आग्रहाची नम्र विनंती त्यांनी केली आहे. ५ नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजता या रॅलीची सुरुवात होणार आहे. चला तर मग येताय ना विकासरथाचे सारथी व्हायला!