भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

8
मुंबई : सांताक्रूझ (पूर्व) येथील भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाइन भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होईल, असे संगीत महाविद्यालय देशात असावे या उद्देशाने राज्य शासनाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियम स्थापन करण्यास मान्यता दिली. या संगीत महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचा साक्षीदार होताना विलक्षण आनंद झाला असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. संगीत क्षेत्रात नवे काही शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामुळे संधी मिळेल आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास वाटत असल्याचेही पाटील यांनी म्हटले.

सांताक्रूझ (पूर्व) येथे 7 हजार चौ.मीटर जागेवर हे महाविद्यालय साकारले जाणार असून याठिकाणी चारशे आसन व्यवस्थेचे सभागृह, 18 क्लास रुम, संग्रहालय आणि प्रदर्शन दालन, 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, 300 आसनी खुले सभागृह आणि शिक्षकांसाठी निवास व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.

या वेळी मंत्रिमंडळातील उच्च-तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद रस्तोगी, जे. जे महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, क्रीश्ना मंगेशकर आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.