सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या तथा माजी महापौर संगीता खोत यांच्या कार्यालयास आज सदिच्छा भेट दिली.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. त्यामुळे विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी माननीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.