पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ऐतिहासिक मताधिक्क्याने विजयी करा – चंद्रकांत पाटील

5
सोलापूर : लोकसभेच्या माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माळशिरस दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच माळशिरस प्रवासादरम्यान पांडुरंग वाघमोडे यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या घोंगडी बैठकीस हजेरी लावली.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, घोंगडी बैठक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला पारंपारिकतेचा साज चढवणारी आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचं व्यासपीठ. हिरव्यागार झाडांखाली समाजातील धुरीणांनी एकत्रित येऊन वैचारिक देवाणघेवाण करणं हे याचं स्वरूप. आज माळशिरस प्रवासादरम्यान पांडुरंग वाघमोडे यांच्या निवासस्थानी अशीच घोंगडी बैठक झाली. या वेळी जमलेल्या पदाधिकाऱ्यांशी विचारांची देवाणघेवाण झाली. दरम्यान, देशाच्या विकासाचा वेग वाढवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ऐतिहासिक मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.