लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांसोबत साधला संवाद

16

सोलापूर : औद्योगिक क्षेत्रात सोलापूर शहराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. सोलापूर ही वस्त्रोद्योग नगरी म्हणूनही परिचित आहे. इथल्या चादरी आणि टॉवेल हे जगप्रसिद्ध आहेत. या अनुषंगाने आज पेंटप्पा गड्डम यांच्या जे. जे. प्रा. लिमिटेडच्या कारखान्यात बैठक आयोजित करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी उद्योग क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. स्टार्ट अप आणि स्टॅंड अपच्या माध्यमातून नव उद्योजकांना उद्योगासाठी प्राधान्य दिले आहे. याचा सोलापुरातील नव उद्योजकांना लाभ झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांना केले. यावेळी सुभाषबाबू देशमुख हे देखील उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.