भाजपा भटके विमुक्त आघाडीचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट

21
सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली.
यावेळी गायकवाड कुटुंबियांच्या आदरातिथ्याने भारावून गेल्याचे मत पाटील याची व्यक्त केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे माननीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.